ZITIZEN BLOGGER TEMPLATE
>> Friday, February 5, 2010
ब्लॉग बनवण्याच्या खूप पध्दती आहेत. जो तो आपल्या आवडत्या साईटवर जाऊन ब्लॉग बनवतो. परंतु मला सर्वात जास्त सोईस्कर म्हणजे टेम्प्लेट्सच्या बाबतीत blogger वर काम करायला फ़ार आवडले. कारण यात टेम्प्लेट्मध्ये आपल्याला हवे ते बदल अगदी सहज करता येतात. टेम्प्लेट हे classic किंवा xml प्रकारचे असते. परंतु या ब्लॉगवरील टेम्प्लेट डाऊनलोड केल्यानंतर ते सर्वात आधी extract करायला विसरु नका. कारण extract केल्यानंतरच ते ब्लॉगवरती अपलोड करता येईल. extract करण्यासाठी winzip किंवा winrar सॉफ़्टवेयर्सचा वापर करा. आपल्याला हा ब्लॉग पहातांना काही अडचणी येत असतील तर आपल्या सुचनांचे स्वागत आहे. त्यासाठी हे टेम्प्लेट निवडतांना मी सुटसुटीत असेच निवडले आहे.
ब्लॉगचे टेम्प्लेट जर बनवायचे असेल तर त्यासाठी html language चे प्राथमिक ज्ञान हे असायलाच हवे आणि javascript चे ज्ञान असेल तर फ़ारच चांगले. कोणतीही भाषा ज्ञात नसेल तर सरळ तुम्ही गुगलचा वापर करून टेम्प्लेट सर्च करू शकता. परंतु काही टेम्प्लेट्स मध्ये एररही असू शकतात. ह्या ब्लॉगवर चांगले चांगले माझ्या कलेक्शनमधील टेम्प्लेट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे टेम्प्लेट्सच्या वेबसाईट्स बद्दल ही माहिती देणार आहे. नवीन ब्लॉगर हे ब्लॉग बनवल्यानंतर सर्वप्रथम ते बदलण्याचाच विचार करतात. कारण तसा विचार मीही केला होता. सर्वात आधी ब्लॉगरमधील क्लासिक टेम्प्लेट्सचा वापर हा करावाच लागला. परंतु जेव्हा इतर काही ब्लॉगचा अभ्यास केला तेव्हा समजले की टेम्प्लेटसुध्दा बदलु शकते. त्यानंतर मग माझा शोध सुरू झाला आणि स्वत:च टेम्प्लेट्स बनवायला सुरूवात केली.
टेम्प्लेट म्हणजे आपल्या ब्लॉगचा साचा किंवा पाया होय. त्या ठराविक साच्यामध्ये किंवा पायामध्ये ब्लॉगची बांधणी केलेली असते. टेम्प्लेट निवडतांना रंग, कॉलम यांचा विचार करणे गरजेचे आहे. जर साधा ब्लॉग तयार करायचा असेल तर २ column टेम्प्लेट योग्य आहे. 1 column टेम्प्लेट्शी उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळे ब्लॉग अगदीच साधा होऊन जातो. त्यासाठी ब्लॉग उठून दिसेल असेच टेम्प्लेट निवडा. अशीच टेम्प्लेट ह्या ब्लॉगवर आपल्याला दिसतील. उदा. खालील टेम्प्लेट बघा. हे एक मॅगझीन टेम्प्लेट आहे.
हे टेम्प्लेट आपल्याला जर आवडले असेल तर free डाऊनलोडींगसाठी येथे क्लिक करा.
3 comments:
चला, कामाची माहीती मिळाली.
धन्यवाद.
नमस्कार,
माझ्या http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ या ब्लॊगमधे मी वापरलेली टेम्प्लेट आहे त्यात डायरीचे डावीकडचे पान अजून रूंद करता येऊ शकेल का?
आणि http://jeevaghene.blogspot.com/ या माझ्याच अजून एका ब्लॊगवर वापरलेल्या टेम्प्लेटमधले ते undefined काढून तिथे तारीख येऊ शकेल का? मुळात जिथून ते घेतले तिथे undefined च्या जागी तारीख दिसत होती.
मला html किंवा java किंवा तसलं काहीही येत नाही. तेव्हा संपूर्ण अडाण्याला मार्गदर्शन कराल तसा उपाय सांगावा ही विनंती. :)
नीरजा नमस्कार,
आपल्या टेम्प्लेटमधील ऑप्शन बदलून टेम्प्लेट चेंज करता येऊ शकते. परंतु त्यासाठी आपल्या टेम्प्लेटचा कोड माहित असणे आवश्यक आहे.
Post a Comment