ब्लॉगसाठी बॅकग्राऊंड म्युझिक
>> Sunday, February 21, 2010
ब्लॉगसाठी बॅकग्राऊंड म्युझिक ही कल्पना किती छान वाटते नाही! ह्या पोस्टमध्ये मी सांगणार आहे ब्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक कसे द्यायचे? त्यासाठी ब्लॉगला widget द्यायची काही गरज नाही. त्यासाठी आपल्या टेम्प्लेट्मध्ये काही फ़ेरबदल करावे लागणार आहेत. घाबरलात, जास्त फ़ेरबदल नाही फ़क्त थोडेसेच. त्यासाठी एक नेहमीची टीप्स म्हणजे आपल्या टेम्प्लेट्चा सर्वप्रथम बॅकप घेणे (हे यासाठीच सांगावे लागते की टेम्प्लेटमध्ये काही बिघाड झाला तर आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फ़िरेल).
सर्वात सोपी पध्दत म्हणजे edit html वर क्लिक केल्यानंतर त्यात हा body कोड शोधा.
ह्या कोडनंतर खाली दिलेला कोड टाका.
<bgsound src="http://yoursite.com/yoursound.mp3" loop=infinite>
या कोडमधील yoursite.com च्या ठिकाणी ब्लॉगचे नाव टाका. त्यानंतर music url द्यावा लागेल yoursound.mp3 च्या ठिकाणी. म्हणजे आपले काम झाले. त्यासाठी सर्वप्रथम म्युझिक युआरएल द्यावा लागेल. म्युझिक युआरएल म्हणजे आपल्या आवडीचे गाणे किंवा म्युझिक एखाद्या म्युझिक साईटवर अपलोड करुन त्याची लिंक देणे होय. परंतु वरील पध्दत वापरून आपल्या ब्लॉगमध्ये continuous म्युझिक वाजत राहणार आणि वाचणाऱ्याला कंटाळा वाटण्याची शक्यता राहते. त्यासाठी खालील कोड वापरुनही आपण म्युझिक देऊ शकतो. त्यासाठी गॅजेट ऍड करुन देखील हे काम होईल. हे गॅजेट खाली मिळू शकेल.
<embed autostart="false" height="40" loop="true" src="http://ownlblog.googlepages.com/BalladePourAdeline.mid" width="300"/></embed>
माझ्या ब्लॉगच्या वरच्या बाजुला दिलेल्या प्लेअरवर हेच म्युझिक आहे.
Read more...