ब्लॉगर टेम्प्लेटमधील Header ची बॉर्डर कशी काढावी?
>> Sunday, February 28, 2010
इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टेम्पलेट हा आपल्या आवडीचा विषय झालेला असेलच याची मला खात्री आहे. कारण नवनवीन टेम्प्लेट्समुळे आपला मुडही अगदी फ़्रेश होऊन जातो. मराठी मध्ये टेम्प्लेट्सच्या जर काही साईटस असतील तर त्या मलाही आपण सांगू शकता. त्यासाठी माझ्या ब्लॉगच्या खालच्या बाजुला cbox ऍड केलेला आहे. त्यावर आपण कमेंट देऊ शकता. मागे मी एका पोस्टमध्ये लिहिले होते ब्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक कसे द्यावे आणि ते तुम्हाला नक्की नक्की आवडले असेल अशी आशा करते.
आजच्या पोस्टमध्ये ब्लॉगर टेम्प्लेटमधील Header ची बॉर्डर कशी काढावी? याबद्दल माहिती सांगणार आहे.
त्यासाठी सर्वात प्रथम blogger.com ला लॉगिन व्हावे लागेल. त्यानंतर dashboard मध्ये जाऊन layout वर क्लिक करा आणि edit html वर क्लिक करा. त्यात border:1px solid $bordercolor; हा कोड शोधा आणि तो काढून टाका. हा कोड #header-wrapper च्या खाली दिसेल. बस झाले आपले काम! त्यानंतर टेम्प्लेट सेव्ह करुन ब्लॉग बघा. ब्लॉगची हिडर बॉर्डर नाहीशी झालेली दिसेल.
परंतु हे सर्व करण्याआधी टेम्प्लेटच बॅकप घ्यायला विसरु नका.
0 comments:
Post a Comment