SUBSCRIBE HERE
SUNFLOWER
>> Saturday, January 23, 2010
ब्लॉग बनवण्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. त्यातील आपल्याला आवडेल येथे http://www.blogger.com/ उघडा. त्यातील create a blog वर क्लिक करा. त्यानंतर तेथे जीमेलचा ईमेल द्या. जीमेलचं अकाऊंट नसेल तर ते आधी बनवावे लागेल. त्यानंतर फ़ॉर्म मधील आवश्यक ती माहिती भरुन व टेम्प्लेट सिलेक्ट करुन ब्लॉग बनवता येतो.
ब्लॉगर मध्ये दिलेले टेम्प्लेट्स आपण बदलु शकतो. मी आपल्याला एक सुंदर टेम्प्लेट ह्या ठिकाणी उपलब्ध करुन देत आहे. हे टेम्प्लेट सनफ़्लॉवरचे आहे. ब्लॉगवर टेम्प्लेट install करतांना एक लक्षात घ्या ते म्हणजे आपल्या मूळ टेम्प्लेटचा backup घ्यायला विसरु नका.

Read more...
DJARAMIS
>> Monday, January 18, 2010
ह्या ब्लॉगमध्ये मी स्वत: बनवलेले आणि काही टेम्प्लेट्स हे डाऊनलोड केलेले आहेत. सर्वच मी बनवलेले नाहीत. परंतु मला ब्लॉगमध्ये नवीन थीम टाकतांना जो त्रास आणि वेळ वाया गेलेला आहे मला वाटते इतरांना आपल्या आवडीचे टेम्प्लेट्स कमीत कमी वेळात मिळायला पाहिजे यासाठीच हा ब्लॉग आहे. आपण खाली दिलेल्या गेस्ट्बुकमध्ये कमेंट टाकून आपल्याला जे पाहिजे ते टेम्प्लेट मिळवू शकाल याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन. कारण मराठीमध्ये खूपच कमी ब्लॉग्स हे "ब्लॉग" च्या माहितीसाठी बनवलेले असतात असे माझे सर्वेक्षण आहे. आपल्याला जर असे ब्लॉग आढळले तर मला ते नक्की सांगा.
आज मी जे टेम्प्लेट देणार आहे. ते खाली दिल्याप्रमाणे दिसेल.आणि आपण ते येथून डाऊनलोड करु शकता.
Read more...
BABY DISNEY
>> Friday, January 15, 2010
इंटरनेटवर आपण वेगवेगळ्या टेम्प्लेटसचा शोध घेत असतो. पण आपल्याला हवे असेल ते मिळविण्यासाठी हा ब्लॉग आहे. आपल्याला जे टेम्प्लेट हवे असेल ते आपण मला सांगू शकता.
हे चित्र बेबी डिस्ने ह्या टेम्प्लेटचे आहे. असे चित्र आपण एखाद्या लहान मुलांच्या ब्लॉगसाठी वापरू शकता. खूप छान दिसेल.
हे टेम्प्लेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read more...
माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा
>> Sunday, January 10, 2010
आज माझ्या या ब्लॉगचा श्रीगणेशा झालेला आहे. या आगळ्यावेगळ्या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत! ब्लॉग बनवणे खूप सोपे असते. परंतु कधी कधी आपल्याला त्याचे टेम्प्लेट आवडत नाही. ही समस्या सोडवण्यासाठीच हा ब्लॉग मी बनवला आहे. जेणेकरुन आ पल्या आवडीचे टेम्प्लेट मिळवणे सर्वांना सोपे जाईल. नेटवर शोधता शोधता आपल्याला खुपच शोधाच्या नंतर आपल्या आवडीचे टेम्प्लेट मिळते.
यासाठी आज ही एक लिंक मी देत आहे. त्यावरुन आपण डाऊनलोड करु शकता.
Read more...