Related Posts with Thumbnails

SUBSCRIBE HERE

Enter your email address:

LATEST:


ब्लॉगर टेम्प्लेटमधील Header ची बॉर्डर कशी काढावी?

>> Sunday, February 28, 2010

इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टेम्पलेट हा आपल्या आवडीचा विषय झालेला असेलच याची मला खात्री आहे. कारण नवनवीन टेम्प्लेट्समुळे आपला मुडही अगदी फ़्रेश होऊन जातो. मराठी मध्ये टेम्प्लेट्सच्या जर काही साईटस असतील तर त्या मलाही आपण सांगू शकता. त्यासाठी माझ्या ब्लॉगच्या खालच्या बाजुला cbox ऍड केलेला आहे. त्यावर आपण कमेंट देऊ शकता. मागे मी एका पोस्टमध्ये लिहिले होते ब्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक कसे द्यावे आणि ते तुम्हाला नक्की नक्की आवडले असेल अशी आशा करते.
आजच्या पोस्टमध्ये ब्लॉगर टेम्प्लेटमधील Header ची बॉर्डर कशी काढावी? याबद्दल माहिती सांगणार आहे.
त्यासाठी सर्वात प्रथम blogger.com ला लॉगिन व्हावे लागेल. त्यानंतर dashboard मध्ये जाऊन layout वर क्लिक करा आणि edit html वर क्लिक करा. त्यात border:1px solid $bordercolor; हा कोड शोधा आणि तो काढून टाका. हा कोड #header-wrapper च्या खाली दिसेल. बस झाले आपले काम! त्यानंतर टेम्प्लेट सेव्ह करुन ब्लॉग बघा. ब्लॉगची हिडर बॉर्डर नाहीशी झालेली दिसेल.

परंतु हे सर्व करण्याआधी टेम्प्लेटच बॅकप घ्यायला विसरु नका.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

BLOG ON FIRE

>> Thursday, February 25, 2010




download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

BLOGGER CHOICE TEMPLATE

खालील टेम्प्लेटची विशेषता म्हणजे कलर. कलर आकर्षक आहे यात शंकाच नाही. तसेच हे ३ कॉलम टेम्प्लेट आहे. वरील कलरप्रमाणेच यामध्ये एक बॅकग्राऊंडही दिसू शकेल. हे टेम्प्लेट ब्लॉगसाठी वापरले तर एक आकर्षक ब्लॉग तयार होऊ शकतो.




download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

माझ्या ब्लॉगचे टेम्प्लेट WEBNOLIA

>> Tuesday, February 23, 2010

माझ्या ब्लॉगचे आधीचे जे टेम्प्लेट होते ते फ़ारच छान होते. ते बदलवण्यामागचे एकच कारण होते ते म्हणजे मला इतक्या गॅजेट्सची गरज नव्हती. आताचे हे जे टेम्प्लेट आहे हे एक मॅगझीन टाईप टेम्प्लेट आहे आणि ब्लॉगवर फ़ारच छान दिसते. हे टेम्प्लेट तुम्हालाही जर आवडले असेल तर त्याची डाऊनलोडींग लिंक मी देणार आहे. ह्या टेम्प्लेटचा preview दाखवण्याची मला गरजच नाही कारण तो तुम्हाला माझ्या ब्लॉगवर प्रत्यक्षच दिसत आहे. तरीही त्याचा preview खालीलप्रमाणे दिसेल





If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

GREENARY STYLE

>> Monday, February 22, 2010


download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

ब्लॉगसाठी बॅकग्राऊंड म्युझिक

>> Sunday, February 21, 2010

ब्लॉगसाठी बॅकग्राऊंड म्युझिक ही कल्पना किती छान वाटते नाही! ह्या पोस्टमध्ये मी सांगणार आहे ब्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक कसे द्यायचे? त्यासाठी ब्लॉगला widget द्यायची काही गरज नाही. त्यासाठी आपल्या टेम्प्लेट्मध्ये काही फ़ेरबदल करावे लागणार आहेत. घाबरलात, जास्त फ़ेरबदल नाही फ़क्त थोडेसेच. त्यासाठी एक नेहमीची टीप्स म्हणजे आपल्या टेम्प्लेट्चा सर्वप्रथम बॅकप घेणे (हे यासाठीच सांगावे लागते की टेम्प्लेटमध्ये काही बिघाड झाला तर आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फ़िरेल).

सर्वात सोपी पध्दत म्हणजे edit html वर क्लिक केल्यानंतर त्यात हा body कोड शोधा.
ह्या कोडनंतर खाली दिलेला कोड टाका.
<bgsound src="http://yoursite.com/yoursound.mp3" loop=infinite>

या कोडमधील yoursite.com च्या ठिकाणी ब्लॉगचे नाव टाका. त्यानंतर music url द्यावा लागेल yoursound.mp3 च्या ठिकाणी. म्हणजे आपले काम झाले. त्यासाठी सर्वप्रथम म्युझिक युआरएल द्यावा लागेल. म्युझिक युआरएल म्हणजे आपल्या आवडीचे गाणे किंवा म्युझिक एखाद्या म्युझिक साईटवर अपलोड करुन त्याची लिंक देणे होय. परंतु वरील पध्दत वापरून आपल्या ब्लॉगमध्ये continuous म्युझिक वाजत राहणार आणि वाचणाऱ्याला कंटाळा वाटण्याची शक्यता राहते. त्यासाठी खालील कोड वापरुनही आपण म्युझिक देऊ शकतो. त्यासाठी गॅजेट ऍड करुन देखील हे काम होईल. हे गॅजेट खाली मिळू शकेल.
<embed autostart="false" height="40" loop="true" src="http://ownlblog.googlepages.com/BalladePourAdeline.mid" width="300"/></embed>

माझ्या ब्लॉगच्या वरच्या बाजुला दिलेल्या प्लेअरवर हेच म्युझिक आहे.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

ORCHESTRA TEMPLATE

>> Friday, February 19, 2010


वर जे टेम्प्लेट आपल्याला दिसत आहे ते music blog साठी आहे. तसेच
ते इतर ब्लॉगसाठी पण छान दिसेल. ते डाऊनलोडींगसाठी येथे क्लिक करा.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

1columntemplate


हे टेम्प्लेट ब्लॉगला असले म्हणजे ब्लॉग किती सुंदर होऊन जाईल. हे 1 column template आहे. फ़ोटो, रेसिपी किंवा कुठल्याही ब्लॉगसाठी चांगलेच वाटेल असेच हे टेम्प्लेट आहे. या ब्लॉगमध्ये मी फ़क्त चांगले चांगले टेम्प्लेट देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे हे टेम्प्लेटही आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. हे एक सुटसुटीत आणि गचाळ नसलेले एक सुंदर टेम्प्लेट आहे.

click here to free download.


download here!



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

MY GREAT MORNING

>> Wednesday, February 17, 2010


वरील picture बघून फ़्रेश वाटत आहे ना? मलाही. कारण हे टेम्प्लेट आहेच असे ताजेतवाने. सकाळ झाली की कसे छान वाटते तसेच हे टेम्प्लेट बघून वाटत आहे. हे टेम्प्लेट आपल्या ब्लॉगलाही असावे असेच वाटत आहे ना? त्यासाठी येथे क्लिक करून हे fresh template डाऊनलोड करुन घ्या.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

COOKING BLOG TEMPLATE

>> Saturday, February 13, 2010

खालील टेम्प्लेट्स बघा.



काय कसं वाटत आहे वर बघून? भूक लागली आहे काय? होय हे टेम्प्लेट रेसिपी ब्लॉगसाठीच आहे. एखाद्या cooking च्या ब्लॉगसाठी वापरलं तर फ़ारच छान दिसेल. एखाद्या अन्नपूर्णेच्या ब्लॉगला शोभून दिसेल असेच आहे हे टेम्प्लेट्स. आजचे हे टेम्प्लेट्स खास महिला ब्लॉगर्ससाठी आहे असे समजू नका. कारण खवैय्येगिरी ही दोन्ही वर्गांसाठी सारखीच आहे. मग डाऊनलोड करताय ना?
त्यासाठी खालील लिंक बघा -
१. पहिल्या टेम्प्लेटसाठी येथे क्लिक करा.
२. दुसऱ्या टेम्प्लेटसाठी येथे क्लिक करा.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

NOT MAGAZENE TEMPLATE

>> Monday, February 8, 2010

ब्लॉगचे टेम्प्लेट कसे बदलावे?

ब्लॉगचे मूळ टेम्प्लेट बदलण्यासाठी सर्वप्रथम blogger.com वर येऊन login करा. त्यानंतर layout मध्ये जाऊन edit html या पर्यायावर क्लिक करा. नंतर खालील कृती करायला नक्की विसरु नका.
edit html वर क्लिक केल्यानंतर DOWNLOAD FULL TEMPLATE वर क्लिक करून मूळ टेम्प्लेट्चा बॅकप घ्या. म्हणजे ते जतन करून ठेवा जेणेकरून नवीन टेम्प्लेट जर नाही आवडले तर आपले मूळ टेम्प्लेटही जाणार नाही. नंतर browse वर क्लिक करुन नवीन टेम्प्लेट घ्या व ते upload करा. ब्लॉगचे टेम्प्लेट बदलले जाईल. नव्या टेम्प्लेटचा चेहरामोहरा बघितल्यावर नवीन पोस्ट टाकायला विसरु नका हं!
आपल्या टेम्प्लेटमध्ये बदल करतांना ओरीजनल टेम्प्लेटची वाट लागणार नाही याची काळजी घ्या. कारण एकदा का ऒरीजनल टेम्प्लेट गेले तर त्यातील सर्व gadgets जे ऍड केलेले असतात त्यांची पण वाट लागते.

नवीन टेम्प्लेट अपलोड केल्यावर पोस्ट टाकायचा आनंद अवर्णनीय असतो हे सांगायला नकोच. आजचे आपले टेम्प्लेट हे मॅगझीनप्रमाणे दिसते परंतु ते 4 column template आहे. ते बघितल्यावर आपणा सर्वांना नक्कीच आवडेल. माझ्या ब्लॉगच्या डाव्या बाजुला ब्लॉग टेम्प्लेट्सच्या वेबसाईटसची यादी मी लावलेली आहे ती बघायला विसरु नका. खूप छान आहेत त्या. त्यासाठी gadget च्या खाली stop बटणावर क्लिक करून वेबसाईट ओपन करता येईल.



हे टेम्प्लेट फ़्री डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

DAILY PLANET A TEMPLATE

>> Sunday, February 7, 2010


हे टेम्प्लेट येथून घेऊ शकता.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

ZITIZEN BLOGGER TEMPLATE

>> Friday, February 5, 2010

ब्लॉग बनवण्याच्या खूप पध्दती आहेत. जो तो आपल्या आवडत्या साईटवर जाऊन ब्लॉग बनवतो. परंतु मला सर्वात जास्त सोईस्कर म्हणजे टेम्प्लेट्सच्या बाबतीत blogger वर काम करायला फ़ार आवडले. कारण यात टेम्प्लेट्मध्ये आपल्याला हवे ते बदल अगदी सहज करता येतात. टेम्प्लेट हे classic किंवा xml प्रकारचे असते. परंतु या ब्लॉगवरील टेम्प्लेट डाऊनलोड केल्यानंतर ते सर्वात आधी extract करायला विसरु नका. कारण extract केल्यानंतरच ते ब्लॉगवरती अपलोड करता येईल. extract करण्यासाठी winzip किंवा winrar सॉफ़्टवेयर्सचा वापर करा. आपल्याला हा ब्लॉग पहातांना काही अडचणी येत असतील तर आपल्या सुचनांचे स्वागत आहे. त्यासाठी हे टेम्प्लेट निवडतांना मी सुटसुटीत असेच निवडले आहे.

ब्लॉगचे टेम्प्लेट जर बनवायचे असेल तर त्यासाठी html language चे प्राथमिक ज्ञान हे असायलाच हवे आणि javascript चे ज्ञान असेल तर फ़ारच चांगले. कोणतीही भाषा ज्ञात नसेल तर सरळ तुम्ही गुगलचा वापर करून टेम्प्लेट सर्च करू शकता. परंतु काही टेम्प्लेट्स मध्ये एररही असू शकतात. ह्या ब्लॉगवर चांगले चांगले माझ्या कलेक्शनमधील टेम्प्लेट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे टेम्प्लेट्सच्या वेबसाईट्स बद्दल ही माहिती देणार आहे. नवीन ब्लॉगर हे ब्लॉग बनवल्यानंतर सर्वप्रथम ते बदलण्याचाच विचार करतात. कारण तसा विचार मीही केला होता. सर्वात आधी ब्लॉगरमधील क्लासिक टेम्प्लेट्सचा वापर हा करावाच लागला. परंतु जेव्हा इतर काही ब्लॉगचा अभ्यास केला तेव्हा समजले की टेम्प्लेटसुध्दा बदलु शकते. त्यानंतर मग माझा शोध सुरू झाला आणि स्वत:च टेम्प्लेट्स बनवायला सुरूवात केली.

टेम्प्लेट म्हणजे आपल्या ब्लॉगचा साचा किंवा पाया होय. त्या ठराविक साच्यामध्ये किंवा पायामध्ये ब्लॉगची बांधणी केलेली असते. टेम्प्लेट निवडतांना रंग, कॉलम यांचा विचार करणे गरजेचे आहे. जर साधा ब्लॉग तयार करायचा असेल तर २ column टेम्प्लेट योग्य आहे. 1 column टेम्प्लेट्शी उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळे ब्लॉग अगदीच साधा होऊन जातो. त्यासाठी ब्लॉग उठून दिसेल असेच टेम्प्लेट निवडा. अशीच टेम्प्लेट ह्या ब्लॉगवर आपल्याला दिसतील. उदा. खालील टेम्प्लेट बघा. हे एक मॅगझीन टेम्प्लेट आहे.



हे टेम्प्लेट आपल्याला जर आवडले असेल तर free डाऊनलोडींगसाठी येथे क्लिक करा.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

MAGAZENE TEMPLATE 2

>> Thursday, February 4, 2010

ब्लॉगच्या टेम्प्लेट्सचे प्रकार असतात हे आता लक्षात आले असेलच. त्यात मॅगझीन हा एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये टेम्प्लेट हे मॅगझीन प्रमाणे आकर्षक दिसते. यातही आपल्याला हवे असलेले बदल आपण करु शकता. यात ऍनिमेशनचेही टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. परंतु ऍनिमेशनच्या टेम्प्लेट्सचा एक प्रॉब्लेम म्हणजे तो ब्लॉग सुरु होण्यास वेळ तर लागतोच परंतु वाचकांना वाचण्यासही त्रासच होतो. तरी देखील ऍनिमेशनचेही टेम्प्लेट्स उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करीन कारण प्रत्येकाच्या आवडी निवडी ह्या वेगवेगळ्या असतात. ह्या ब्लॉगमध्ये टेम्प्लेट्सप्रमाणेच ब्लॉगच्या टीप्स सुध्दा आपणास देण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी माझा इंग्रजी ब्लॉग कार्यान्वित आहेच. परंतु मराठीमध्येही त्या टीप्स आपल्याला मिळतील.

आजचे आपले टेम्प्लेटही इतर टेम्प्लेट्सप्रमाणे आकर्षकच आहे. त्याचा प्रीव्ह्यु खालीलप्रमाणे -

वरील सुरेख टेम्प्लेट डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

AC MILAN TEMPLATE

>> Tuesday, February 2, 2010

ब्लॉग टेम्प्लेट निवडतांना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि ते टेम्प्लेट आपल्या ब्लॉगला शोभून दिसेल की नाही. कारण First Impression is last impression. म्हणून ब्लॉगच्या टेम्प्लेट्साठी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे 2 column, 3 column, 4 column तसेच 5 column टेम्प्लेट उपलब्ध आहे. ब्लॉग तयार करतांना ब्लॉगरचे टेम्प्लेट घ्यावे लागतात. त्यानंतर आपण आपल्या टेम्प्लेट मध्ये हवे ते बदल करु शकतो. म्हणजेच नवीन गॅजेट ऍड करु शकतो, एकाचवेळेस जास्त गॅजेट तसेच हिडरला किंवा फ़ुटरलाही extra gadget टाकू शकतो. परंतु हे सर्व बदल करतांना किंवा नवीन टेम्प्लेट टाकतांना आपल्या जुन्या टेम्प्लेटचा बॅकप घ्यायला विसरु नये. कारण नवीन बदल करण्याच्या भानगडीत जुने टेम्प्लेट ही हातातुन जाण्याची शक्यता असते. ब्लॉगचे टेम्प्लेट हे रंगबिरंगीच असले पाहिजे असे नाही. ते साधेही असले तरी चालते. आपला ब्लॉग कोणत्या विषयाशी संबंधित आहे यावरुन ते स्पष्ट होते. आपल्याला जर जास्त gadget लागत असतील तर 3 , 4 किंवा 5 column टेम्प्लेट्स जास्त फ़ायदेशीर असतात. माझ्या ह्या ब्लॉगव्दारे मी सर्व प्रकारचे टेम्प्लेट free देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम फ़क्त यासाठीच की आपल्याला हवे असलेले टेम्प्लेट किंवा नवीन ब्लॉग तयार करणाऱ्यांना सोईचे जावे.
खालील
टेम्प्लेट आपल्याला नक्कीच आवडेल असेच आहे. तसेच जे टेम्प्लेट आपल्याला हवे असेल त्या टेम्प्लेटची मागणी शेजारी दिलेल्या cbox मध्ये नोंदवू शकता. ती मागणी पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. खालील टेम्प्लेट आपण येथुन डाऊनलोड करु शकता.



If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

MAGAZENE TEMPLATE 1

>> Monday, February 1, 2010

आज मी हे सुंदर आणि छान टेम्प्लेट सादर करणार आहे. हे मॅगझीन टेम्प्लेट आहे. हे टेम्प्लेट वापरून एका छान अशा ब्लॉगची निर्मिती करता येऊ शकते. हे टेम्प्लेट खालीलप्रमाणे दिसेल. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.




If you enjoyed this post, make sure you subscribe to my regular Email Updates!

Total Posts: 89
Total Comments: 22

Online Readers:

टेम्प्लेट्सच्या ह्या वेबसाईट्स नक्की बघा

मराठी ब्लॉग्जवर नोंदणीकृत ब्लॉग!

ब्लॉगची पेजरॅंक चेक करा

अनुक्रमणिका

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP